Ticker

6/recent/ticker-posts

नफा तोटा सुत्रे व शाब्दिक उदाहरणे

नफा-तोटा संबंधित सर्व संकल्पना स्पष्ट करणे, सर्व महत्त्वाची सुत्रे व नमूना शाब्दिक उदाहरणे सोडवा. 

(१) खरेदी किंमत - माल ज्या किंमतीला घेतात ,त्या किमतीला खरेदी किंवा खरेदीची किंमत असे म्हणतात.
(२) विक्री किंमत - माल ज्या किंमतीला विकतात ,त्या किमतीला विक्री किंवा विक्रीची किंमत असे म्हणतात.
(३) नफा - खरेदीपेक्षा विक्री जास्त असल्यास नफा होतो.
(४) तोटा - खरेदीपेक्षा विक्री कमी झाल्यास तोटा होतो .
(५) खरेदीच्या किमतीत केवळ खरेदीच्या किमतीचा विचार करून चालत नाही, तर माल विक्रीला ठेवण्यापूर्वी त्यावर केलेले इतर खर्च ....  उदा., वाहतूक खर्च ,हमाली , कर ,दुरूस्तीसाठी केलेला खर्च यांचाही विचार करावा लागतो .
(६) एकूण खरेदी = मूळ खरेदी + इतर खर्च .

(७) नफा व तोट्याचे सूत्र :
a) नफा = विक्री-खरेदी
b) तोटा =खरेदी - विक्री

c) i) खरेदी = विक्री - नफा
ii) खरेदी = विक्री + तोटा

d) i) विक्री = खरेदी + नफा
ii) विक्री = खरेदी - तोटा



नफा-तोटा नमुना प्रश्न


(१) ४९६३ रुपयांस खरेदी केलेल्या वस्तू ५३५४ रूपयांस शिकवल्या , तर या व्यवहारात किती नफा अथवा तोटा होईल ?
१) ₹ ३९१ तोटा होईल
२) ₹ ४०९ नफा होईल
३) ₹ ३९१ नफा होईल
४) ₹ ४९१ तोटा होईल
  स्पष्टीकरण : येथे विक्रीची किंमत खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे . म्हणून, या व्यवहारात नफा होईल.
नफा = विक्री - खरेदी  
₹ ५३५४ - ₹४९६३ = ₹३९१
पर्याय (३) हे अचूक उत्तर आहे.

(२) सलीमने ₹ २५ प्रकरणी डझन या दराने ३ डझन पेन्सिली खरेदी केल्या व त्या प्रत्येकी ₹ ३ प्रेमाने शिकवल्या ,तर या व्यवहारात त्याला किती नफा झाला ?
१) ₹ ३३
२) ₹ ११
३) ₹ ३६
४) ₹ ४५
स्पष्टीकरण : खरेदी किंमत = ₹ २५ × ३ ₹ ७५
विक्री किंमत = (३ × १२ )× ३ = ₹ १०८  (१ डझन = १२ पेन्सिली
३ डझन = ३× १२ = ३६ पेन्सिली)
नफा = ₹ १०८ - ₹ ७५ = ₹ ३३
पर्याय (१) हे अचूक उत्तर आहे .
(हे उत्तर आपण १ डझन पेन्सिलींच्या विक्रीतून मिळणारा नफा आधी काढूनही मिळवू शकतो.)

Post a Comment

0 Comments